top of page
5102tZtPBPL._SL1500_.jpg

सुसज्ज सी.सी.टीव्ही यंत्रणा

विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी सुसज्ज सी.सी.टीव्ही यंत्रणा –विद्यार्थिनी सुरक्षितेला अधिक महत्व देऊन सर्व शाळा परिसर C.C.T.V कक्षेत आणला आहे .पालक वर्ग यामुळे आपला पाल्य या शाळेत सुरक्षित असून शाळा प्रशासन सुरक्षिततेसाठी विविध यंत्रणा राबवत आहे यामुळे निश्चित आहे .
IMG-20191121-WA0036.jpg

सुसज्ज संगणक प्रयोगशाळा

आजच्या यंत्रयुगात टिकून राहायचे असेल तर माहिती तंत्रज्ञानावर भर दिला पाहिजे या हेतूने संगणक प्रयोगशाळा सुसज्ज असून विद्यार्थिनींना पायाभूत संगणक ज्ञानाबरोबर अनिमेशन कोर्स 

एम .आय .टी अमेरिका व गुरुजी फौंडेशन  याचे वतीने सुरु करून विद्यालयाची संगणक साक्षर विद्यालय अशी ओळख निर्माण करण्यासाठी शाळा पुढाकार घेत आहे

IMG-20191121-WA0027.jpg

डिजिटल क्लासरूम, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही व्यवस्था

ज्ञान  दिल्याने वाढते या उक्तीप्रमाणे आज विद्यार्थिनींना स्पर्धेच्या युगात ज्ञान समृद्ध व अद्ययावत  ठेवणे गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही व OHP द्वारे अध्यापन केले जाते .त्याद्वारे एखादी  संकल्पना पटकन समजू शकते.
premium_photo-1677567996070-68fa4181775a.jpeg

सुसज्ज  ग्रंथालय विभाग

ग्रंथालयात पुस्तक पेढी संकल्पनेद्वारे विद्यार्थिनींना क्रमिक पुस्तकाबरोबर गोष्टी कथा, ऐतिहासिक कादंबरी ,जीवन चरित्रे इ साहित्यरूपी पुस्तके वाचायला दिली जातात.अवांतर वाचनामुळे ज्ञान समृद्ध होते त्याचा विद्यार्थिनींना भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा साठी खूप फायदा होतो.

विद्यालयाची खास वैशिष्ट्ये
  'हरेक लेक माझी शाळेत आली पाहिजे , शिकून मोठी साहेबीन झाली पाहिजे.

* फक्त मुलींची शाळा - गुणवत्तेचं खणखणीत नाणं.

 

* विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची सोय

 

*एन.एम.एम.एस,सारथी शिष्यवृत्ती व शासकीय शिष्यवृत्ती(इ.५ वी व ८वी) उत्कृष्ठ निकालाची परंपरा .

 

* नृत्य, नाट्य, संगीत, कला प्रशिक्षणाची खास सोय


*इ. १० वी १००% निकालाची परंपरा कायम

 

* इ.५ वी ते इ. १० वी सेमी इंग्रजी  व मराठी माध्यमाची सोय

 

* अद्ययावत  डिजीटल क्लासरूम

 

* स्मार्ट TV चा अध्यापनात वापर

* गुरुजी फाउंडेशन च्या वतीने एमआयटी स्क्रॅच कोर्स ॲनिमेशन व कोड लँग्वेज ची ओळख

*इयत्ता ७वी श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा
 

* क्रीडा प्रकारानुसार नियमित सराव व वैयक्तिक मार्गदर्शन

*  शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विमान प्रवास, रेल्वे प्रवासाचा अनुभव

 

* खास प्रशिक्षित शिक्षक वर्ग

 

* एम. सी. सी, आर. एस. पी,स्काऊट गाईड प्रशिक्षणाची सोय

*  शासकीय चित्रकला स्पर्धा मार्गदर्शन

 

*मोफत प्रवेश, नवीन प्रवेशास मोफत गणवेश ,मोफत पाठ्यपुस्तक

 

* मुलींसाठी अहिल्याबाई मोफत बस पास योजना

 

* शिष्यवृत्ती परीक्षमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलींसाठी शिक्षकांकडून १००१/- विशेष बक्षीस.

 

* किशोरवयीन मुलींसाठी तज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन.

 

*पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण बीजारोपण कार्यक्रम

 

* विद्यार्थिनींच्या स्व-संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाची सोय

* भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

 

* सौंदर्य, वेशभूषा विषयीचे प्रशिक्षण

 

* विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव  देण्यासाठी फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, विविध हस्तकला स्पर्धाचे आयोजन

 

* निबंध, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मार्गदर्शन.

 

* विद्यार्थिनींची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी

IMG-20190815-WA0110.jpg

एम.सी.सी ,आर.एस.पी व स्काऊट गाईड मार्गदर्शन

विद्यार्थिनी सर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतात त्यातून व्यक्तिमत्व विकस साधता येतो .M.C.C स्पर्धेत श्री .जयवंत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर प्रथम व जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून त्यामुळे M.C.C प्रशिक्षणास पालकवर्गाची पहिली पसंती मिळत आहे .
pngtree-chemical-research-laboratory-png-image_5412072.jpg

          सुसज्ज प्रयोगशाळा

विज्ञान शिक्षक श्री .सुरेश राजे ,श्री .प्रकाश पाटील ,श्री सीताराम कोळेकर सर यांचे मार्गदर्शनानुसार प्रयोगशाळा विज्ञान साहित्यांनी सुसज्ज आहे .कृतीतून शिक्षण ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान विषयाचे अध्यापन केले जाते .

IMG-20191121-WA0031.jpg

   इनडोअर, आऊटडोअर खेळाची सोय

ॲथलेटिक्स,व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन,सायकलिंग, कॅरम इत्यादी खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते त्याद्वारे विद्यार्थिनींचा शारीरिक व  मानसिक विकास केला जातो. विद्यालयामध्ये टेबल टेनिस विभागामध्ये  टेबल व विद्यार्थिनी सरावासाठी रोबोटची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे
CLS.jpg

संगीत शिक्षणाची सोय ,गायन, वादन, नृत्य इ.प्रशिक्षण

विद्यार्थिनी सर्व गुण संपन्न व्हाव्यात व त्यांनी कोणतीही एक कला त्याच्या काळानुसार व आवडीने शिकावी यासाठी या प्रशिक्षणाची सोय केली आहे .
bottom of page