
प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
(स्थापना दि. ७-६-१९८४)जा.क्र.एस्.-२/नं. शाळा/को.वि. १२७४३-४७ कोल्हापूर दि. १८-६-८४
यु डायस नंबर -27310221510

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर
“ विद्यार्थिनींचा सर्वागिण विकास हाच कन्याशाळेचा ध्यास ”
तर चला मग
प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर येथे आपले स्वागत आहे


ग्रामीण भागातील व परिसरातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने स्वतंत्र कन्याशाळेची स्थापना सन 1984 मध्ये केली. सध्या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सेमी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या मिळून एकूण 13 तुकडया असून 520 इतकी विद्यार्थिनी संख्या आहे. शाळेकडे नियमानुसार नियुक्त असलेले 18 शिक्षक व 6 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आजपर्यंत या विद्यालयाने ग्रामीण परिसरातून येणाऱ्या विद्यार्थिनी असूनही उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शक्य त्या योजनांचा लाभ देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन दिले आहे. संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ)व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार आणि कन्याशाळा मलकापूर प्रशासन, विद्यार्थिनी व शिक्षणप्रेमी पालकवर्ग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने शाळा आज नावारूपास येत आहे .
इयत्ता १० वी उत्कृष्ट निकालाची परंपरा, एन.एम. एम. एस. शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा निकालांचा वाढता आलेख,बौद्धिक विकासाबरोबर क्रीडात्मक कौशल्यांचा विकास करण्यात व विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे देण्याचे काम केले जात आहे याचाच परिणाम म्हणून प्रत्येकवर्षी विद्यार्थिनी पटसंख्येत वाढ होत आहे .


आमची प्रेरणा
मा.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर

अध्यक्ष
मा.पांडुरंग गणपती पाटील

उपाध्यक्ष
मा.भास्करराव बाबुराव पाटील

खजिनदार
मा.तुळशीराम शंकर शिर्के



संचालक
मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संचालक
मा.प्रा.संजय जोतीराम
थोरात

मार्गदर्शक संचालिका
डॉ.स्वाती रणजीत
थोरात