top of page
  •  फक्त मुलींची शाळा - गुणवत्तेचं खणखणीत नाणं.

  •  विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची सोय

  • एन.एम.एम.एस,सारथी शिष्यवृत्ती व शासकीय शिष्यवृत्ती(इ.५ वी व ८वी) उत्कृष्ठ निकालाची परंपरा .

  • नृत्य, नाट्य, संगीत, कला प्रशिक्षणाची खास सोय

  • इ. १० वी १००% निकालाची परंपरा कायम

  • इ.५ वी ते इ. १० वी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची सोय

  • अद्ययावत  डिजीटल क्लासरूम

  • स्मार्ट TV चा अध्यापनात वापर

  • इयत्ता ७वी श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा

  • गुरुजी फाउंडेशन च्या वतीने एमआयटी स्क्रॅच कोर्स ॲनिमेशन व कोड लँग्वेज ची ओळख

  • भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

  • सौंदर्य, वेशभूषा विषयीचे प्रशिक्षण

  • विद्यार्थिनीच्या सुप्त कलागुणांना वाव  देण्यासाठी फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, विविध हस्तकला स्पर्धाचे आयोजन

  • निबंध, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मार्गदर्शन.

  • विद्यार्थिनीची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी

  • लांबून येणाऱ्या मुलींसाठीसाठी बसची सोय उपलब्ध.

  • दिव्यांग विदयार्थिनी शिष्यवृत्ती योजना

  • विद्यार्थिनींना पिण्याचे पाणी- वॉटर  प्युरिफायर व कुलरची  सोय.

  • क्रीडा प्रकारानुसार नियमित सराव व वैयक्तिक मार्गदर्शन

  • शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विमान प्रवास, रेल्वे प्रवासाचा अनुभव

  • खास प्रशिक्षित शिक्षक वर्ग

  •  एम. सी. सी, आर. एस. पी,स्काऊट गाईड प्रशिक्षणाची सोय

  •  शासकीय चित्रकला स्पर्धा मार्गदर्शन

  •  शिष्यवृत्ती परीक्षमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलींसाठी शिक्षकांकडून १००१/- विशेष बक्षीस.

  • किशोरवयीन मुलींसाठी तज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन.

  • पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण बीजारोपण कार्यक्रम

  • मुलीच्या स्व-संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाची सोय

  • मोफत प्रवेश, नवीन प्रवेशास मोफत गणवेश ,मोफत पाठ्यपुस्तक

  • मुलींसाठी अहिल्याबाई मोफत बस पास योजना

ज्ञानार्थ या सेवार्थ जा ......विद्यार्थिनींचा  सर्वागिण विकास हाच कन्याशाळेचा ध्यास  .......

Notebook and Keyboard

मुख्याध्यापिका मनोगत

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर मुलींसाठी स्वतंत्र शाळा असावी या हेतूने इ. स.1984 साली स्थापन झालेली श्रीमती प्रे. च. कन्याशाळा मलकापूर हे आपले विद्यालय आज विद्यार्थिनींच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा क्रीडात्मक, गुणात्मक, कलात्मक अर्थात सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने अग्रेसर आहे.

          एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी  इयत्ता पाचवी ते आठवी शासकीय शिष्यवृत्ती, एन.एम. एम.एस व सारथी शिष्यवृत्ती, श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा , चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट, स्पीड मॅथ्स, इयत्ता दहावी एस.एस.सी बोर्ड परीक्षा, इतर सर्व स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासणारी व ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन व सायकलिंग इत्यादी वैयक्तिक व सांघिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांतील क्रीडात्मक गुणांचा विकास करून त्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणारी व आजच्या स्पर्धेच्या व डिजिटल युगात अध्यापन तंत्रात काळानुसार बदल करून स्मार्ट टीव्ही द्वारे अध्यापन करणारी आपली कन्याशाळा आज लोकांच्या पसंतीस उतरत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

           विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची व्यवस्था, विद्यार्थिनींच्या भावनिक विकासासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.शर्वरी बेलापुरे यांचे वेळोवेळी घेतले जाणारे समुपदेशन, उच्च प्रशिक्षित शिक्षक, शिक्षिका वृंद व भौतिक सुविधांसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व विविध सेवाभावी संस्थांची बहुमोल स्वरूपात मिळणारी मदत यामुळे आमचे विद्यालय शाळा सिद्धि व SQAAF(शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा) मध्ये अग्रेसर ठेवण्यात आम्हाला यश मिळत आहे.

       अलीकडे गेली दोन वर्ष एम.आय.टी अमेरिका द्वारा गुरुजी फाउंडेशन सांगली यांच्या सहकार्याने स्क्रॅच कोर्स द्वारे विद्यार्थिनींना कोड लँग्वेज द्वारे ॲनिमेशन स्टोरी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे याद्वारे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे असून त्याला पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

         वेबसाईटला भेट देऊन आपण आमच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल  आपले मनःपूर्वक धन्यवाद..

IMG-20250812-WA0027_edited.png

सौ.भिसे सुलोचना विष्णू
मुख्याध्यापिका

विद्यालयाची वैशिष्ट्ये

"हरेक लेक माझी शाळेत आली पाहिजे , शिकून मोठी साहेबीन झाली पाहिजे."

ज्ञान सरिता नित्य खळखळे | विज्ञान संस्कारे पिकती मळे
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,
प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर
Green Background

उद्दिष्टे

विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच विविध अंगी विकास करण्यासाठी  शाळेमध्ये सहशालेय उपक्रम राबवले जातात. यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. विविध शालेय व सहशालेय उपक्रमातून त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास होतो व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकास, संस्कार, सृजनशीलता, सामाजिक बांधिलकी, सेवावृत्ती, राष्ट्रभक्ती इत्यादी क्षमतांचा विकास होतो व एक आदर्श व्यक्तिमत्व उदयास येते. फक्त शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण व सर्वांगीण विकास होतो.                  

                 विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध मूल्य त्याच्यामध्ये रुजवणे गरजेचे आहे तसेच योग्य वयामध्ये योग्य संस्कार त्याच्यावरती होणे आवश्यक आहे. म्हणूनच एक त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम होय. इथेच व्यक्तिमत्व विकासाची बीजे रुजवली जातात व या मधूनच विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून येते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.    

              विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक काळ हा अत्यंत संवेदनशील व जडणघडणीस योग्य असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक नैतिक शारीरिक सामाजिक अध्यात्मिक विकासासाठी त्यांना समर्थ व सुयोग्य जबाबदार नागरिक घडवण्यासाठी अभ्यास व इतर उपक्रमच अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सामाजिक व नवराष्ट्र निर्मितीच्या परिवर्तनाचे धुरा शिक्षण संस्थांच्या वरती सोपवण्यात आली आहे.

ज्ञान सरिता नित्य खळखळे | विज्ञान संस्कारे पिकती मळे
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,
प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर
bottom of page